कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक 
Co-op Banks

कोल्हापूर जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना २८.७५ कोटी वर्ग

जाहीर केलेल्या दहा टक्के लाभांशाचे वितरण

Pratap Patil

कोल्हापूर:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सभासद संस्थांना शेअर्स रकमेच्या दहा टक्क्यांप्रमाणे जाहीर केलेला २८ कोटी ७५ लाख रुपये लाभांश त्यांच्या खात्यांत वर्ग केला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील गावागावांमधील एकूण3 १३ हजार २९० सभासद सहकारी संस्थांना हा लाभांश वितरित केला आहे. यामध्ये सहकारी साखर कारखाने, प्राथमिक विकास सेवा संस्था, सहकारी दूध संस्था, सहकारी पतसंस्था, सहकारी अर्बन बँका, सहकारी

सूत गिरण्या, सहकारी पाणीपुरवठा संस्था, सहकारी पतसंस्थांचा समावेश आहे. शेअर्स भागधारणा पूर्ण केलेल्या सभासद संस्थांना दहा टक्क्यांनुसार हा लाभांश वर्ग केला आहे.

SCROLL FOR NEXT