कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निपुणराव कोरे ,उपाध्यक्षपदी विठ्ठलराव मोरे  कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या
Co-op Banks

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निपुणराव कोरे

उपाध्यक्षपदी विठ्ठलराव मोरे

Pratap Patil

कोल्हापूर: सन २०२५-२०३० सालासाठीची कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मा. प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ( दि. ५ ऑगस्ट २०२५ ) असोसिएशनच्या नूतन संचालक मंडळाची सभा पार पडली. या वेळी असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी श्री. निपुणराव कोरे (अध्यक्ष, श्री वारणा सहकारी बँक) यांचे नाव श्री. शिरीष कणेरकर यांनी सुचविले तर श्री. एम. पी. पाटील यांनी त्यास अनुमोदन दिल्यानंतर श्री. निपुणराव कोरे यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्री. विठ्ठलराव मोरे (संचालक श्री भरत अर्बन को-ऑप. बँक) यांचे नाव श्री. सूर्यकांत पाटील यांनी सुचविले व त्यास श्री. राजाराम शिपुगडे यांनी अनुमोदन दिल्यानंतर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी श्री. विठ्ठलराव मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

याप्रसंगी मा. प्रेरणा शिवदास, श्री. निपुण कोरे, श्री. विठ्ठल मोरे, श्री. शिरीष कणेरकर, श्री. सूर्यकांत पाटील आणि श्री. एम. पी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व नवनिर्वाचीत संचालकांचे स्वागत असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल नागराळे यांनी केले. संचालक श्री. रविंद्र पंदारे यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT