खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक) यांनी वरिष्ठ ते व्यवस्थापकीय स्तरावरील विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. बँकेने या भरतीसंदर्भातील अधिकृत माहिती प्रसिद्ध केली असून इच्छुक उमेदवारांना 26 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही विद्याशाखेत पदवीधर
पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए
सीए (फ्रेशर) / CAIIB धारक उमेदवारांना प्राधान्य
अनुभव:
सहकारी किंवा कमर्शियल बँकेत मध्यम/वरिष्ठ स्तरावर किमान 10 ते 15 वर्षांचा अनुभव
आयटीसंबंधित अनुभव असेल तर अधिक प्राधान्य
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी
एमबीए / सीए (फ्रेशर)
JAIIB / CAIIB पात्र उमेदवारांना प्राधान्य
अनुभव:
सहकारी किंवा कमर्शियल बँकेत अधिकारी/व्यवस्थापक स्तरावर 8 ते 10 वर्षांचा अनुभव
आयटीचे ज्ञान/अनुभव असेल तर प्राधान्य
पगार पॅकेज उमेदवाराच्या पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर निश्चित करण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता कागदपत्रांसह अर्ज 26 डिसेंबर 2025 पूर्वी पुढील माध्यमातून पाठवावा:
ई-मेल: boardsecretary@khamgaonbank.in
पोस्टाने: खामगाव अर्बन को-ऑप. बँक लि., खामगाव
बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देखील संबंधित तपशील उपलब्ध आहे. www.khamgaonbank.in
भरतीसंदर्भातील ही घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी, खामगाव अर्बन को-ऑप. बँक यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.