जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर आणि अधिकारी जनकल्याण सहकारी बँक
Co-op Banks

जनकल्याण सहकारी बँकेची मजबूत आर्थिक वाढ

५२ व्या वार्षिक सभेत माजी अधिकारी, संचालकांचा गौरव

Pratap Patil

मुंबईस्थित जनकल्याण सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये निव्वळ एनपीए शून्यावर आणत आणि मजबूत आर्थिक वाढ नोंदवत ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे. बँकेने ४१.०८ कोटी रुपयांचा प्रभावी ढोबळ नफा कमवला आहे. बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यानिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे माजी अधिकारी व संचालकांचा गौरव करण्यात आला.

बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर यांनी सांगितले की, "मागील काही वर्षांपासून उच्च एनपीएशी झुंज देणाऱ्या या बँकेने २०२२-२३ मध्ये १३.८७% असणारा निव्वळ एनपीए ३१ मार्च २०२५ अखेर शून्यावर आणलेला आहे. त्याचबरोबर, निव्वळ नफा ८.११ कोटींवरून १०.३६ कोटींवर पोहोचला आहे. संचित नफा ४१.०८ कोटींवर (१५.६४% वाढ) आणि निव्वळ मूल्य ११३.६५ कोटींवर (२२.१०% वाढ) गेले. सीआरएआर १३.७५% वरून १५.३१% पर्यंत सुधारला, तर सकल एनपीए १७.४३% वरून ८.५३% पर्यंत घटलेला आहे.

आम्ही हे यश सर्व शाखांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि भागधारक व संचालक मंडळाच्या पाठिंब्यामुळे मिळवले आहे. गेल्या वर्षी ठेवींत वाढ करण्याकडे अधिक लक्ष न देता वसुलीवर लक्ष केंद्रित केले आणि जुन्या थकबाकी वसूल केल्या. बँक आता बहु-राज्य सहकारी बँक होण्याचे ध्येय ठेवत असून, कर्नाटक किंवा गुजरातमधील चांगल्या कामगिरी करणाऱ्या बँकेसोबत विलीनीकरणाच्या प्रक्रियेत आहे."

उपाध्यक्ष किशोर बगाडे यांनी आपल्या भाषणात भागधारकांसाठी सुरू केलेल्या "फ्लेक्सीकेअर - कॅन्सर क्रिटिकल केअर पॉलिसी"ची सविस्तर माहिती दिली. या योजनेत भागधारकांना फक्त २५% प्रीमियम भरून १० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते.

या सभेत बँकेच्या प्रगतीसाठी घेतलेले निर्णय व योगदानाबद्दल बँकेचे माजी कार्यकारी अधिकारी सतीश मराठे, नरेंद्र बेहेरे, प्रदीप काकतकर, रत्नाकर गावस्कर आणि माजी संचालक मंडळ सदस्य राजेश गेवैदी, भावना वैद्य, मोहन बने, तुलसीदास देशमुख यांचा गुणगौरव करण्यात आला.

SCROLL FOR NEXT