जनता सहकारी बँक 
Co-op Banks

जनता सहकारी बँक पुणे येथे सहाय्यक महाव्यवस्थापक पदांसाठी भरती जाहीर

अनुभवी बँकिंग व्यावसायिकांसाठी संधी; शाखा व्यवस्थापक किंवा मुख्य व्यवस्थापक म्हणून अनुभव असलेले उमेदवार पात्र

VIJAY CHAVAN

जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे (मल्टीस्टेट शेडयुल्ड बँक) यांनी सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager - AGM) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. बँकेने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्पष्ट करण्यात आला आहे

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, सहकारी बँकेत किमान १५ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक असून, त्यापैकी काही काळ उमेदवाराने शाखा व्यवस्थापक (Branch Manager) किंवा मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) म्हणून कार्य केलेले असावे.

खाजगी किंवा राष्ट्रीयकृत बँकांमधील उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी आहे, मात्र त्यांना शाखा व्यवस्थापक किंवा तत्सम वरिष्ठ पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

बँकेने नमूद केले आहे की ही पदभरती अशा उमेदवारांसाठी आहे जे संस्थेचे नेतृत्व करू शकतात, बदल घडवून आणू शकतात आणि संस्थात्मक विकासात योगदान देऊ शकतात.

इच्छुक उमेदवारांना अधिक माहिती आणि अर्ज सादर करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला (www.janatabankpune.com) भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT