गुंतवणूक फसवणूक 
Co-op Banks

गुंतवणूक फसवणूक: मोठ्या नफ्याला भुलू नका!

ऑफरची शांतपणे पडताळणी करा!

Pratap Patil

गुंतवणूक फसवणूक म्हणजे अशी फसवी योजना ज्यामध्ये फसवणूक करणारे गुन्हेगार लोकांना गुंतवलेल्या रकमेवर इतरांपेक्षा (बँका, पतसंस्था, पोस्ट) जास्त नफा देण्याचे आश्वासन देतात. मात्र, प्रत्यक्षात हे शक्य नसतेच. अशा योजनेत गुंतवणूकदारांना (आधीच्या) नफा देण्यासाठी प्रत्यक्ष आर्थिक उत्पन्नातून प्राप्त झालेले नव्हे, तर नवीन गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे वापरले जातात. यालाच "पॉन्झी योजना (Ponzi Scheme)" असेही म्हणतात.

अशी फसवणूक टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

या गोष्टी आवर्जून करा (Dos):

  • गुंतवणूक व्यवहार नोंदणीकृत संस्थांशीच करा: फक्त SEBI-नोंदणीकृत मध्यस्थांमार्फतच गुंतवणूक करा.

  • गुंतवणूक उत्पादने तपासा: नेहमी नियामक संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या वित्तीय उत्पादनांमध्येच गुंतवणूक करा.

  • माहितीपूर्ण राहा: दक्षतेसाठी केवळ अधिकृत व विश्वसनीय स्रोतांमधूनच वित्तीय माहिती मिळवा.

  • संशयास्पद क्रिया नोंदवा: जास्त नफा देणाऱ्या व्यक्ती, संस्थांवर लक्ष ठेवा. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

या गोष्टी करू नयेत (Don'ts):

  • जास्त नफा मिळतो म्हणून हुरळून जाऊ नका: कोणतीही मोठ्या नफ्याची ऑफर मिळाल्यास त्याची शांतपणे पडताळणी करा.

  • अविश्वसनीय परताव्यांवर विश्वास ठेवू नका: "जोखीम नसलेल्या" जास्त नफ्याच्या योजनांपासून दूर राहा.

  • संशयास्पद गटांपासून दूर राहा: सोशल मीडियावर चालणाऱ्या संशयास्पद ट्रेडिंग ग्रुप्समध्ये सहभागी होऊ नका.

  • लाल निशाणांकडे (शंकास्पद बाबी) दुर्लक्ष करू नका: सतत एकसारखा किंवा अत्यंत जास्त नफा मिळत असल्यास त्वरित सावध व्हा.

SCROLL FOR NEXT