जगभरात लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या चीनलाही मागे टाकलेल्या आपल्या देशात सध्या १४६ कोटी लोक वास्तव्य करतात. मात्र या अवाढव्य लोकसंख्येला विमा संरक्षण देणाऱ्या केवळ ६१ कंपन्या अस्तित्वात आहेत. याउलट १४२ कोटी म्हणजे थोडीशी का असेना कमी लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये तब्बल २४२ विमा कंपन्या विमा संरक्षण पुरवतात. सर्वांत जास्त ५,००० विमा कंपन्या अमेरिकेत असून त्यांची लोकसंख्या मात्र केवळ ३५ कोटी आहे. चला तर एक नजर टाकूयात विमा कंपन्याच्या तुलनेत जगभरात आपण कुठे आहोत यावर:
लोकसंख्या (कोटींमध्ये) तुलनेत विमा कंपन्यांची संख्या.