(NUCFDC) चे सीईओ प्रभात चतुर्वेदी गजानन सहकारी बँकेचे सीईओ महादेव रंगनाथ क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉक्टर शेख मंजूर अहमद शेख सलीम, सहायक व्यवस्थापक श्री. सोनार व राठोड अवॉर्ड स्वीकारताना  
Co-op Banks

गजानन सहकारी बँक बीडला बेस्ट रिस्क मॅनेजमेंट ॲवॉर्ड प्रदान

अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

Pratap Patil

बीड येथील श्री गजानन नागरी सहकारी बँकेला" नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स ॲन्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नवी दिल्ली (NUCFDC) चे सीईओ प्रभात चतुर्वेदी यांच्या हस्ते नुकताच "बेस्ट रिस्क मॅनेजमेंट ॲवॉर्ड- २०२५" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना बँकेचे सीईओ महादेव रंगनाथ क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉक्टर शेख मंजूर अहमद शेख सलीम, सहायक व्यवस्थापक श्री. सोनार व राठोड उपस्थित होते.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री गजानन नागरी सहकारी बँकेचे चेअरमन श्री. जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर (अण्णा), उपाध्यक्ष श्री. जगदीश वासुदेव काळे (भाऊ) यांनी संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व सभासद, ठेवीदार व खातेदारांचे आभार मानले.

SCROLL FOR NEXT