गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँक 
Co-op Banks

दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप बँकेचा ३६३ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण

सलग ३ वर्षे नेट एन.पी.ए. शून्य टक्के राखण्याचा 'गडहिंग्लज अर्बन'चा विक्रम

Prachi Tadakhe

गडहिंग्लज: सहकार क्षेत्रात आपल्या पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभाराने नाव लौकिक मिळवलेल्या 'दि गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.' ने ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे. बँकेने एकूण ३६३ कोटी ६७ लाख रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असून, सलग तिसऱ्या वर्षी नेट एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे.

आर्थिक स्थितीचा आढावा:

बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवी २१३ कोटी ३६ लाखांवर पोहोचल्या असून कर्जवाटप १५० कोटी ३० लाखांपर्यंत झाले आहे. बँकेचे भाग भांडवल ६२८.३१ लाख असून राखीव व इतर निधी ३९११.८१ लाख रुपये आहे. या आर्थिक वर्षात बँकेने ३२७.३३ लाख रुपयांचा ढोबळ नफा कमावून आपली नफाक्षमता सिद्ध केली आहे.

कर्ज वसुलीत उत्कृष्ट कामगिरी: आजच्या स्पर्धात्मक युगात बँकेने आपल्या आर्थिक शिस्तीचा दर्जा कायम राखला आहे. बँकेचा Gross NPA ४.५७% असला तरी, तरतुदींनंतर नेट एन.पी.ए. सलग तिसऱ्या वर्षी ०.००% राखण्यात बँकेला यश आले आहे. तसेच बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १७.१०% इतके असून, ते रिझर्व्ह बँकेच्या निकषांपेक्षा कितीतरी अधिक व भक्कम आहे.

ग्राहकांचा दृढ विश्वास:

"आधुनिक स्पर्धेच्या युगात यशाच्या उत्तुंग शिखरावर" हे ब्रीद सार्थ ठरवत बँकेने गडहिंग्लज आणि परिसरात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ३६३ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार करणे हे बँकेच्या विश्वासार्हतेचे प्रतीक मानले जात आहे.

बँकेच्या या देदीप्यमान यशाबद्दल बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बँकेने आपल्या यशाचे श्रेय सर्व सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांना दिले आहे.

SCROLL FOR NEXT