बँकेत नोकरी हवीय? द्वारकादास मंत्री बँक, बीड घेऊन आलीये भरतीची संधी! 
Co-op Banks

बीड: द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती

छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत संधी.

Prachi Tadakhe

बीड: सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि., बीड यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील शाखांसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीबाबतची अधिकृत जाहिरात बँकेने प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

पदे तपशील खालीलप्रमाणे:

बँकेने दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी लिपिक आणि अधिकारी पदांच्या जागा जाहीर केल्या आहेत:

१. छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखांसाठी:

  • पद: लिपिक (Clerk)

  • एकूण जागा: ०७

  • शैक्षणिक पात्रता: बी.कॉम / एम.कॉम / डी.टी.एल. / एम.सी.एम. उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.

२. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा शाखांसाठी:

  • पद १: अधिकारी / शाखा व्यवस्थापक (Officer / Branch Manager)

    • एकूण जागा: ०२

    • पात्रता: एम.बी.ए. किंवा एम.कॉम किंवा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधर. (बँकिंग व सहकार क्षेत्राचा किमान ५ वर्षांचा अनुभव अनिवार्य) आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.

  • पद २: लिपिक (Clerk)

    • एकूण जागा: ०७

    • पात्रता: बी.कॉम / एम.कॉम / डी.टी.एल. / एम.सी.एम. उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.

अर्जाची प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती:

  • अर्जाची शेवटची तारीख: पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दि. २० मे २०२६ पर्यंत बँकेकडे पोहोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.

  • अर्ज कसा करावा?

    उमेदवार आपले अर्ज आवश्यक त्या प्रमाणित कागदपत्रांसह आणि फोटोसह खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने पाठवू शकतात:

    १. ई-मेलद्वारे: dmnshr@gmail.com या पत्त्यावर मेल करावा.

    २. टपालाद्वारे: बँकेच्या मुख्य कार्यालयावर पोस्टाने अर्ज पाठवावा.

    ३. थेट अर्ज: बँकेच्या मुख्य कार्यालयात (जालना रोड, बीड) स्वतः जाऊन अर्ज जमा करता येईल.

महत्त्वाच्या अटी:

  • उपरोक्त पात्रता नसलेल्या उमेदवारांच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

  • नेमणुकीच्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा सर्व अधिकार बँक व्यवस्थापनाकडे राखीव असेल.

बँकिंग क्षेत्रातील अनुभवी आणि नवोदित तरुणांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन बँकेच्या प्र. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

संपर्क पत्ता: मुख्य कार्यालय: जालना रोड, बीड. फोन नं. (०२४४२) २३० २९३

SCROLL FOR NEXT