नवरात्रोत्सव आणि सरकारच्या जीएसटी कपातीच्या दुहेरी परिणामामुळे भारतातील डिजिटल व्यवहारांनी विक्रमी भरारी घेतली असून, एका दिवसातच ११ लाख कोटींचा आकडा पार केला आहे. यामुळे नागरिकांकडून सणासुदीच्या खरेदीला नवा वेग मिळाला असून, अर्थव्यवस्थेला सकारात्मक चालना मिळण्याची अपेक्षा आहे. नुकतीच जाहीर केलेली जीएसटी कपात आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या मोठ्या ऑफर्समुळे श्राद्ध काळ संपताच आणि नवरात्रोत्सवाची सुरुवात होताच, दसरा-दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा आत्मविश्वास व खर्चाची क्षमता नव्या उंचीवर पोहोचलेली आहे. भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये जवळपास दहापट वाढ झाली आहे.
आरबीआयची आकडेवारी:
सोमवारी (२२ सप्टेंबर ): एकूण इलेक्ट्रॉनिक पेमेंट रु. ११.३१ लाख कोटी.
मागील दिवस: केवळ रु. १.१८ लाख कोटी.म्हणजेच एकाच दिवसात व्यवहारांत जवळपास १० पट वाढ झालेली आहे.
मंगळवारी (२३ सप्टेंबर ): डिजिटल व्यवहार रु.११.१९ लाख कोटींवर स्थिर.
या आकडेवारीवरून सणासुदीच्या हंगामात व्यवहार आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसतात.
जीएसटी कपातीचा थेट परिणाम:
सरकारने अलीकडेच कर स्लॅब (स्तर) कमी करताना, कार, मोटारसायकली आणि घरगुती उपकरणांवरील करात मोठी कपात केली आहे.
कारवरील कर २८% वरून १८% पर्यंत कमी केला आहे.
ऑटोमोटिव्ह कंपन्या व डीलर्ससाठी विक्रीचा मार्ग खुला झाला आहे.
ग्राहकांचा ई-कॉमर्सवर उपकरणे, कपडे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकडे कल.
ई-कॉमर्स विक्रीचा धडाका:
फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या वार्षिक १० दिवसांच्या सण-उत्सव विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे.
क्रेडिट कार्ड खर्च: सहा पटीने वाढून रु. १०,४११ कोटी झाला आहे.
डेबिट कार्ड खर्च: तिपटीने वाढून रु. ८१४ कोटी झाला आहे.
ग्राहकांनी उच्च-मूल्याच्या खरेदीत उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.
बँक आणि उद्योग तज्ज्ञांचे मत:
बँकेचे प्रमुख म्हणतात -
"श्राद्ध काळ संपल्याने, नवरात्रोत्सवाची सुरुवात, जीएसटी कपात आणि ई-कॉमर्स सवलतींमुळे ग्राहकांत वस्तू खरेदी करण्यासाठी उत्साह वाढला आहे. परिणामी कपडे आणि घरगुती उपकरणांवर खर्च मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे."
"कमी महागाई, जीएसटी सवलत आणि सण-उत्सवाचे वातावरण यामुळे ई-कॉमर्स, ट्रॅव्हल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात खरेदीची लाट उसळेल, अशी आम्हाला खात्री आहे."
डिजिटल चॅनेल्समध्ये सर्वाधिक पसंती RTGS ला:
RTGS व्यवहार: एका दिवसापूर्वीच्या रु. १७,१६६ कोटींवरून थेट रु. ८.१४ लाख कोटींवर
उच्च-मूल्य खरेदी (विशेषतः कार) बहुतेकदा RTGS द्वारे होत आहे.
खरेदीसाठी डिजिटल व्यवहारांना ग्राहक व डीलर्स यांच्याकडून मिळाली पहिली पसंती.
अर्थतज्ज्ञांचे मत:
अर्थतज्ज्ञांच्या मते, ही वाढ फक्त सणासुदीच्या खर्चापुरती मर्यादित राहणार नाही.
ग्राहकांकडून डिजिटल व्यवहारांची स्वीकारार्हता झपाट्याने वाढत आहे.
जीएसटी कपातीनंतर मध्यमवर्गीय व शहरी ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
ग्रामीण भागातदेखील UPI व डेबिट कार्ड वापर वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
पुढील दिशा:
नवरात्र, दसरा आणि दिवाळी या तिन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर खरेदी आणखी वाढेल असा अंदाज आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी हा विक्रीचा हंगाम ऐतिहासिक ठरू शकतो.
ई-कॉमर्स कंपन्या व बँका विशेष ऑफर्सद्वारे या गतीला आणखी चालना देणार आहेत.