देवगिरी नागरी सहकारी बँकेकडून प्रगत इंटरनेट बँकिंग सुरू; बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते सोशल मीडियाद्वारे सेवेची घोषणा. 
Co-op Banks

देवगिरी बँक झाली अधिक स्मार्ट: नव्या इंटरनेट बँकिंग सुविधेचे उद्घाटन

"ग्राहकांना घरबसल्या सुरक्षित आणि जलद व्यवहार करता येणार"; अध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती.

Prachi Tadakhe

छत्रपती संभाजीनगर:

ग्राहकांना आधुनिक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकार क्षेत्रातील आघाडीची संस्था असलेल्या देवगिरी नागरी सहकारी बँकेने आपल्या अत्याधुनिक इंटरनेट बँकिंग सेवेचा (Advanced Internet Banking) अधिकृत शुभारंभ केला आहे. डिजिटल बँकिंगच्या या नव्या पर्वामुळे ग्राहकांना आता घरबसल्या विविध आर्थिक व्यवहार सहज, सुरक्षित आणि जलद पद्धतीने करता येणार आहेत. या सुविधेसह अत्याधुनिक नेट बँकिंग सेवा देणाऱ्या देशातील मोजक्या निवडक सहकारी बँकांच्या क्लबमध्ये आता देवगिरी बँकेचा समावेश झाला आहे.

नुकताच बँकेला “शेड्यूल्ड बँकेचा” सर्वोच्च दर्जा प्राप्त झाला असून, अशी कामगिरी करणारी ही मराठवाड्यातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. डिजिटल क्रांतीचा स्वीकार करत बँकेने सुरू केलेली ही प्रगत सेवा ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

बँकेच्या या नव्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्ममध्ये सर्वसामान्य ग्राहकांसह व्यावसायिक (Corporate) ग्राहकांच्या गरजांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.

  • सर्वसामान्य ग्राहकांसाठी (Retail Banking): Balance Enquiry (शिल्लक तपासणे), निधी हस्तांतरण (NEFT / RTGS / बँक अंतर्गत ट्रान्सफर), कर्ज खात्यांची परतफेड, खाते विवरणपत्र (Statement) डाउनलोड करणे आणि धनादेश (Cheque) व्यवस्थापन यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

  • व्यावसायिक ग्राहकांसाठी (Corporate Banking): कॉर्पोरेट ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या प्रगत सुविधा यात देण्यात आल्या आहेत. यामध्ये Bulk Transaction Upload, Maker-Checker Authorization (द्विस्तरीय मंजुरी प्रणाली) आणि ग्राहक व्यवहार मर्यादा निश्चिती (Transaction Limit Setting) यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे.

ग्राहकांच्या व्यवहारांची सुरक्षितता लक्षात घेऊन बँकेने यामध्ये चोवीस तास कार्यरत असणारी अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रणाली वापरली आहे. यामुळे मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून वाचक कधीही आणि कुठूनही सुरक्षित व्यवहार करू शकतील.

नव्या इंटरनेट बँकिंग सेवेची मुख्य वैशिष्ट्ये:

  • घरबसल्या बँकिंग: ग्राहकांना आता किरकोळ आणि व्यावसायिक व्यवहारांसाठी प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

  • अत्याधुनिक सुरक्षा (High Security): सायबर फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी या प्लॅटफॉर्ममध्ये प्रगत सुरक्षा मानकांचा आणि सुरक्षित डिजिटल पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे.

  • वापरण्यास सुलभ (User-Friendly Interface): सर्वसामान्य ग्राहकांपासून ते डिजिटल बँकिंगची नवी ओळख असलेल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सहज हाताळता येईल असे याचे स्वरूप आहे.

  • विविध सेवांचा लाभ: याद्वारे फंड ट्रान्सफर, खात्यावरील शिल्लक तपासणे, स्टेटमेंट डाऊनलोड करणे यांसह विविध बँकिंग सेवा एकाच क्लिकवर उपलब्ध होतील.

सामाजिक बांधिलकी आणि संचालक मंडळाचे आवाहन

बँकेमार्फत आर्थिक सेवांसोबतच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक जनजागृती यांसारखे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मा. श्री. किशोर शितोळे यांनी दिली.

डिजिटल युगातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन ग्राहकांना अधिक पारदर्शक आणि सुलभ बँकिंग सेवा देण्याचा बँकेचा मानस आहे. ग्राहकांनी या नव्या इंटरनेट बँकिंग सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष किशोर शितोळे, संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाने केले आहे.

या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह संचालक सर्वश्री राजेश सावळकर, सजनराव मते, श्रीमती जयश्रीताई किवळेकर, प्रल्हाद (प्रशांत) देशपांडे, नागनाथ काजळे, सौ. अमिता लेकुरवाळे, सागर विद्वंस, सुरेश जगाडे उपस्थित होते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण नांदेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे व रुपेंद्र कोयाळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

SCROLL FOR NEXT