रामघरिया सहकारी बँक रामघरिया सहकारी बँक
Co-op Banks

दिल्लीस्थित रामघरिया सहकारी बँकेने सरकारी मदतीने साधले पुनरुज्जीवन

शेअरवरील मर्यादा हटवून कामकाजात सकारात्मकता आणली

Pratap Patil

दिल्लीस्थित रामघरिया सहकारी बँकेने आरबीआयच्या कठोर निर्देशांनंतरही सरकारच्या निर्णायक मदतीच्या पाठिंब्यामुळे बँकेला नव्याने उभारी मिळवलेली आहे. खास करून केंद्र सरकार आणि सहकार मंत्री रविंदर सिंग (इंद्रराज) योग्य वेळी केलेल्या मदतीमुळे बँकेला पुनरुज्जीवन मिळाले आहे. त्यामुळे या बँकेने आपल्या कामकाजात लक्षणीय सुधारणा केलेली आहे.

पूर्वी प्रति शेअरहोल्डर २०,००० रुपयांची शेअर जारी करण्याची मर्यादा बँकेच्या भांडवल वाढीमध्ये अडथळा ठरत होती. मात्र, दिल्ली सरकारच्या मदतीने ही मर्यादा काढून टाकण्यात आली, त्यामुळे बँकेने ५.३७ कोटी रुपयांवरील भागभांडवल ९ कोटींवर वाढवले. त्यापैकी ३.७५ कोटी रुपये अवघ्या एका महिन्यात जमा करण्यात आले. यामुळे बँकेची निव्वळ संपत्ती नकारात्मक ते सकारात्मकमध्ये बदलली आणि पुनरुज्जीवनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.

बँकेचा CRAR -११% वरून ७.२९% वर वाढला असून, तो RBIच्या किमान ९% च्या जवळ पोहोचला आहे. संचित तोटा १८ कोटींवरून ११ कोटी रुपयांपर्यंत घटला आहे.

बँकेच्या अध्यक्षा रणजीत कौर यांनी या मदतीबद्दल सरकारचे आभार मानत पुढील ४-५ महिन्यांत बँक पूर्णपणे स्थिर होण्याचा विश्वास व्यक्त केला. रामघरिया सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन हा धोरणात्मक पाठिंबा आणि समुदाय सहभाग याचा यशस्वी नमुना ठरला आहे.

SCROLL FOR NEXT