उद्‌घाटनप्रसंगी कॉसमॉस बँकेचे संचालक ॲड. घनशाम अमिन, अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे, नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक श्री बी.के. सिंघल, व्यवस्थापन मंडळअध्यक्ष सीए मिलिंद काळे 
Co-op Banks

कॉसमॉस बँकेची गुजरातमध्ये मोठी झेप; १० नवीन शाखांचे एकाच वेळी उद्‌घाटन

३८ शाखांसह गुजरातमध्ये मजबूत उपस्थिती, एकूण शाखा संख्या १९३ वर; अत्याधुनिक सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध

Prachi Tadakhe

पुणे: देशातील आघाडीची सहकारी बँक असलेल्या कॉसमॉस बँकेने गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर शाखा विस्तार करत १० नवीन शाखा सुरू केल्या आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहक सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे.

दि. २५ मार्च रोजी गांधीनगर शाखेचे उद्घाटन इफ्कोचे अध्यक्ष दिलीपभाई संघानी यांच्या हस्ते, चंगोदर शाखेचे उद्घाटन न्यायाधीश जयेश भैरविया यांच्या हस्ते, तसेच नवसारी शाखेचे उद्घाटन बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मुकेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले.

दि. २७ मार्च रोजी साऊथ बोपाल शाखेचे उद्घाटन कॉसमॉस बँकेचे संचालक ॲड. घनशाम अमिन, हिंमतनगर शाखेचे उद्घाटन नॅफकबचे संचालक व खोडीयार क्रेडिट को-ऑपचे अध्यक्ष कांतीभाई पटेल, वेसू (सुरत) शाखेचे उद्घाटन संचालक प्रवीणकुमार गांधी तसेच कटारगाम शाखेचे उद्घाटन नॅफकबचे संचालक व दि वर्चा को-ऑप बँकेचे अध्यक्ष कांजीभाई भलाला यांच्या हस्ते करण्यात आले.

दि. ३० मार्च रोजी निकोल शाखेचे उद्घाटन नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक बी. के. सिंघल, सायन्स सिटी शाखेचे उद्घाटन गुजरात स्टेट को-ऑप बँकेचे अध्यक्ष अजयभाई पटेल तसेच स्पीडवेल चौक, राजकोट शाखेचे उद्घाटन उत्कर्ष इस्पातचे अध्यक्ष नीरज आर्या यांच्या हस्ते करण्यात आले.

गुजरातमध्ये १० नवीन शाखा सुरू झाल्यामुळे या राज्यातील बँकेच्या शाखांची संख्या ३८ झाली असून देशभरातील एकूण शाखा संख्या १९३ वर पोहोचली आहे.

नवीन शाखांमधून ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा, लॉकर सुविधा तसेच विविध ठेवी आणि कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय ४२,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे.

विविध शाखांच्या उद्घाटनावेळी बँकेचे अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे, संचालक अजित गिजरे व सचिन आपटे तसेच व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे उपस्थित होते. नजीकच्या काळात दक्षिण भारत आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार करण्याचे नियोजन असल्याचे सीए काळे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT