Ministry of Finance 
Co-op Banks

सहकारी बँकांना सरकारी रोखे लिलावात थेट प्रवेश

सहकारी बँकांच्या गुंतवणूक पर्यायांना मिळणार बळकटी

Pratap Patil

नवी दिल्ली सहकारी बँकांच्या गुंतवणूक पर्यायांना बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना आता अर्थ मंत्रालयाने सहकारी बँकांना भारत सरकारच्या सिक्युरिटीजच्या (Government Securities – G-Secs) लिलावात थेट सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

सरकारकडून १२ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या लिलावात ६.०१% जीएस २०३० व ७.२४% जीएस २०५५ या दोन सिक्युरिटीज पुन्हा जारी केल्या जातील. दोन्ही इश्यूंचा एकत्रित कर्ज आकार २८,००० कोटी रुपये इतका आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव कोटा:

या इश्यूचा काही भाग गैर-स्पर्धात्मक बोली (Non-Competitive Bidding – NCB) सुविधेअंतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र सहकारी बँकांना त्यांच्या "वैधानिक दायित्वांमुळे" (statutory obligations) विशेष दर्जा दिला गेला आहे.

सहकारी बँकांसाठी वेगळं काय?:

  • वैयक्तिक गुंतवणूकदार आणि इतर संस्थांना शेड्युल्ड बँका किंवा स्टॉक एक्सचेंज सारख्या ॲग्रीगेटर्समार्फत बोली लावावी लागते.

  • परंतु सहकारी बँका थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे गैर-स्पर्धात्मक बोली लावू शकतात.

  • यामुळे त्यांना वेगवान सहभाग सुनिश्चित करता येईल आणि त्यांच्या ट्रेझरी ऑपरेशन्सला (निधी व्यवस्थापन) बळकटी मिळणार आहे.

मिळणारे फायदे:

सरकारी सिक्युरिटीजमध्ये सहकारी बँकांना थेट गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाल्याने :

  • त्यांचे गुंतवणूक पोर्टफोलिओ (संग्रह)विविधीकृत होईल.

  • अतिरिक्त निधी सुरक्षित पद्धतीने वापरण्याचा मार्ग उपलब्ध होईल.

  • शेती, लघु उद्योग आणि ग्रामीण भागातील समुदायांना वित्तपुरवठा करणाऱ्या सहकारी बँकांची भूमिका आणखी मजबूत होईल.

SCROLL FOR NEXT