कोल्हापूर: दि कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर या बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ७.४० कोटी रुपयांचा ढोबळ नफा (7.40 Cr Profit) संपादन केला आहे. बँकेचे अध्यक्ष श्री.अतुल शहा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ७ शाखा कार्यरत आहेत.
३१ मार्च २०२६ अखेर बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम दिसून येत आहे:
एकूण व्यवसाय: बँकेने ५२४.८८ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
ठेवी व कर्जे: बँकेकडे एकूण ३१८.८४ कोटी रुपयांच्या ठेवी (Deposits) असून, २०६.०४ कोटी रुपयांचे कर्ज (Loan) वाटप करण्यात आले आहे.
भांडवल: बँकेचे भाग भांडवल (Share Capital) ११.४८ कोटी रुपये असून स्वनिधी ६५.४२ कोटी रुपये इतका आहे.
एन.पी.ए. (NPA): कर्ज वितरण आणि वसुली प्रक्रिया अत्यंत कार्यक्षमतेने राबवल्यामुळे बँकेने आपला निव्वळ एन.पी.ए. ०% राखण्यात यश मिळवले आहे.
बँकेने आपल्या ग्राहकांसाठी काळानुरूप बदल करत रुपे डेबिट कार्ड, मोबाईल बँकींग आणि युपीआय (UPI) यांसारख्या अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
चालू आर्थिक वर्षात ५०० कोटींचा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर, आता पुढील काळात ८०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे. हे ध्येय गाठण्यासाठी सर्व सभासद आणि ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष श्री.अतुल शहा यांनी केले आहे.
या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष श्री.अतुल शहा, उपाध्यक्षा सौ.शर्मिला कणेरकर आणि सर्व संचालक मंडळाने बँकेचे सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुधीर कदम यांच्यासह बँकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.