सेंट्रल बँक ऑफ इंडिया 
Co-op Banks

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 275 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; 23 मार्च 2026 पर्यंत अर्ज करण्याची संधी

Vijay chavan

देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या Central Bank of India ने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 275 पदे भरण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 23 मार्च 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.

या भरतीमध्ये प्रामुख्याने तंत्रज्ञान आणि वित्तीय विभागांमधील विविध पदांचा समावेश आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी यांची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीतून तपासावी, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा होणार असून या परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असेल. या परीक्षेत एकूण 90 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार असून कमाल 100 गुण असतील. विशेष म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे उमेदवारांना कोणत्याही दंडाशिवाय सर्व प्रश्न सोडवण्याची संधी मिळणार आहे.

लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीदरम्यान उमेदवारांचे तांत्रिक ज्ञान, समस्या सोडवण्याची क्षमता तसेच संबंधित क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव यांचे मूल्यमापन केले जाईल.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन Careers किंवा Recruitment या विभागात जावे. त्यानंतर स्पेशालिस्ट ऑफिसर भरतीची जाहिरात निवडून आवश्यक माहिती भरून नोंदणी करावी. अर्ज फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करून ऑनलाईन अर्ज शुल्क भरावे लागेल. शेवटी अर्ज सादर करून त्याची प्रत भविष्यासाठी जतन करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या भरतीसाठी अर्ज शुल्कामध्येही वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वेगळी रचना ठेवण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये ठेवण्यात आले आहे. तर इतर सर्व उमेदवारांसाठी 850 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती आणि अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Notification_Recruitment_Specialist.pdf
Preview
SCROLL FOR NEXT