मा. अतुलजी वाकोडे मा. अतुलजी वाकोडे
Co-op Banks

अतुलजी वाकोडे यवतमाळ भाजप सहकार सेल जिल्हाध्यक्षपदी

२००९ मध्ये ‘अद्विता अर्बन बँके’ची स्थापना करून सहकार सेवेला वाहिलेलं आयुष्य.

Pratap Patil

आर्णी: तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अनुभवी युवा नेते श्री.अतुलजी वाकोडे यांची भाजपच्या सहकार सेल यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

अतुलजी वाकोडे यांनी २००९ साली सहकार क्षेत्रात कृतिशील पदार्पण करत ‘अद्विता अर्बन बँके’ची स्थापना केली. आपल्या मेहनतीने आणि स्वच्छ दृष्टिकोनाने त्यांनी बँकेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील जनतेला सातत्याने आर्थिक सेवा पुरविली. सहकार क्षेत्रात त्यांनी उभारलेले योगदान लक्षात घेता २०२३ साली त्यांना ‘उद्योगरत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय, इतर अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे.

राजकीय क्षेत्रातही अतुलजी वाकोडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते म्हणून भरीव काम केले आहे. कुठलाही पदलोभ न ठेवता पक्षासाठी अहोरात्र नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या रूपाने त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि एकनिष्ठतेची दखल घेत अखेर पक्षाने त्यांना सहकार सेलच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सहकार सेल ॲड. प्रफुल्लजी चव्हाण यांनी यवतमाळ जिल्हा कार्यालयातून ही नियुक्ती जाहीर केली. निवडीनंतर अतुलजी वाकोडे यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर, नेते मदनजी येरावार, आमदार राजूजी तोडसाम आणि नितीनजी भुतडा यांचे आभार मानले.

या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना अतुलजी वाकोडे म्हणाले, “मी सहकार क्षेत्रातील माझ्या अनुभवाच्या आधारे पक्षाची भरभराट कशी साधता येईल आणि सहकार क्षेत्रात भाजपचे कार्य कसे वृद्धिंगत करता येईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. पक्षाच्या वाढीसाठी संपूर्ण निष्ठेने कार्य करत राहणार आहे.”

SCROLL FOR NEXT