बिहार राज्य सहकारी बँक 
Co-op Banks

बिहार राज्य सहकारी बँकेचा "SBI GIC" सोबत करार

ग्राहक सेवांचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

Pratap Patil

पाटणा येथील बिहार राज्य सहकारी बँक लिमिटेडने (BSCB) ग्राहक सेवांचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (SBI GIC) सोबत औपचारिक करार केला आहे. SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (SBI GIC) त्यांना बँक शाखांद्वारे थेट विस्तृत श्रेणीतील विमा सेवा प्रदान करण्यासाठी साहाय्य करणार आहे.

पाटणा येथे बिहारचे सहकार मंत्री डॉ. प्रेम कुमार यांच्या उपस्थितीत या करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडून नोंदणी मंजुरी मिळाल्यानंतर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे आणि त्यामुळे राज्यातील सहकारी बँक ग्राहकांसाठी विमा सेवा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

याप्रसंगी सहकार विभागाचे सचिव धर्मेंद्र सिंह, सहकारी संस्थांचे निबंधक अंशुल अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या करारामुळे बिहार राज्य सहकारी बँक केवळ एक बँकिंग संस्था म्हणून नव्हे तर एक व्यापक वित्तीय सेवा प्रदाता संस्था म्हणून देखील ओळखली जाणार आहे. सहकारी बँकांनी समुदायांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक लवचिकता प्रदान करण्यासाठी घेतलेल्या वाढत्या भूमिकेचे हे प्रतिबिंब आहे.

SCROLL FOR NEXT