बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी: 'दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि., नांदेड' येथे विविध पदांसाठी मेगा भरती सुरू 
Co-op Banks

दि भाग्यलक्ष्मी महिला सह. बँक, नांदेड येथे विविध पदांसाठी मेगा भरती

नांदेडसह महाराष्ट्रातील ६ प्रमुख जिल्ह्यांमध्ये २२ शाखा असलेल्या नामांकित सहकारी बँकेत त्वरित भरती.

Prachi Tadakhe

नांदेड : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि अनुभवी उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या आणि 'सर्वोत्कृष्ट महिला बँक पुरस्कारा'ने सन्मानित असलेल्या 'दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि., नांदेड' या बँकेत विविध महत्त्वाच्या आणि व्यवस्थापकीय पदांसाठी त्वरित भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

रु. १५०० कोटींच्या व्यवसायाकडे यशस्वी घोडदौड करणारी ही बँक संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्रात विस्तारलेली असून, सध्या बँकेच्या २२ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा दिली जात आहे. बँकेच्या निरंतर प्रगतीला आणि विस्ताराला गती देण्यासाठी सक्षम, कल्पक आणि अनुभवी मनुष्यबळाची आवश्यकता असून, त्यासाठी बँकेने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

भरती केली जाणारी पदे खालीलप्रमाणे:

१. मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO)

२. उप मुख्याधिकारी (Deputy CEO)

३. मानव संसाधन (HR Manager)

४. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर (CRM)

५. शाखाधिकारी (Branch Manager - सब-अकौंटंट / अकौंटंट) (जळगांव, छ. संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड या जिल्ह्यातील शाखांकरिता)

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, शाखाधिकारी (सब-अकौंटंट / अकौंटंट) या पदासाठी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये जळगांव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. संबंधित जिल्ह्यातील स्थानिक बँकिंग व्यवहारांची आणि भौगोलिक परिस्थितीची जाण असणाऱ्या उमेदवारांसाठी हे एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरणार आहे.

अर्ज कसा करावा?

या सर्व पदांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि इतर निकषांची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पात्रता निकष जाणून घेण्यासाठी व अर्ज प्रक्रियेसाठी बँकेच्या www.bhagyalakshmibank.com या वेबसाईटला भेट देऊन संपर्क साधावा, असे आवाहन बँकेच्या प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बँकेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, सदर पदभरतीचे सर्व अंतिम अधिकार बँकेने स्वतःकडे राखून ठेवले आहेत. ही जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि., नांदेड यांच्यामार्फत जारी करण्यात आली आहे.

  1. मुख्य कार्यालय: भाग्यलक्ष्मी भवन, कृषी उत्पन्न बाजार समिती कमानी समोर, व्ही.आय.पी. रोड, नवा मोंढा, नांदेड - ४३१ ६०२.

  2. ईमेल: ho@bhagyalakshmibank.com

  3. वेबसाईट: www.bhagyalakshmibank.com

SCROLL FOR NEXT