उच्चशिक्षित व अनुभवी नेतृत्व! श्री. भगवान पाटील एस बँकेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी 
Co-op Banks

एअर कॉर्पोरेशन को-ऑप बँकेच्या CEO पदी श्री. भगवान पाटील यांची नियुक्ती!

२३ वर्षांचा समृद्ध बँकिंग अनुभव; अमृत महोत्सवी वर्षात बँकेला मिळालं नवं नेतृत्व.

Prachi Tadakhe

मुंबई : एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी श्री. भगवान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बँकेचे अध्यक्ष श्री. राजेश भागवत आणि उपाध्यक्ष श्री. निलेश लांजेकर यांनी श्री. भगवान पाटील यांचे बँकेत स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बँकेचे संचालक श्री. उमेश सानप, श्री. ऋषिकेश बांडुक, श्री. शाम खवळे, श्री. संदीप जाधव, श्री. संदीप मोरे तसेच कर्मचारी प्रतिनिधी श्री. राजेंद्र पारकर, श्रीमती सुचिता म्हात्रे आणि वरिष्ठ व्यवस्थापिका श्रीमती वर्षा पटेल उपस्थित होते.

२३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि उच्च शिक्षण

नवनियुक्त सीईओ श्री. भगवान पाटील हे शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत उच्चविभूषित आहेत. त्यांनी बी.ई. (केमिकल) - B.E. (Chemical), एम.एम.एस. (फायनान्स) - M.M.S. (Finance), L.L.M., CAIIB तसेच GDCA या पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांना बँकिंग क्षेत्रातील २३ वर्षांचा प्रदीर्घ व समृद्ध अनुभव असून, त्यांच्या या अनुभवाचा फायदा बँकेच्या पुढील प्रगतीसाठी होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

७४ वर्षांची उज्ज्वल परंपरा व अमृत महोत्सवी वर्ष

एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाली आहे. ७४ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत बँक सध्या आपला अमृत महोत्सव साजरा करत आहे. मुंबईत सध्या बँकेच्या चार शाखा कार्यरत असून, ही बँक प्रामुख्याने पगारदार कर्मचारी वर्गाच्या आर्थिक गरजा आणि विस्तार वेगाने पूर्ण करण्यासाठी बांधील आहे.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित

बँकेच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेची व सेवेची दखल घेत नुकतेच विविध स्तरांवर बँकेचा गौरव करण्यात आला आहे:

  • महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन: सन २०२५-२६ या वर्षासाठी ‘पगारदार बँक’ श्रेणीत प्रथम पुरस्कार.

  • बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन: सन २०२५-२६ साठी पगारदार श्रेणीतील ‘उत्कृष्ट बँक पुरस्कार’

नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँक तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक ग्राहकभिमुख सेवा देईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT