पुणे – महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र असलेल्या आणि सुमारे १६६० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित, पुणे यांनी महिला उमेदवारांसाठी विविध पदांवर भरती जाहीर केली आहे. बँकेच्या विस्तार आणि वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या भरती अंतर्गत General Manager (GM), Manager, Management Trainee (CA) आणि Officer या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. बँकिंग, फायनान्स, करप्रणाली आणि सहकारी क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
ही भरती सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.
General Manager (GM) पदासाठी उच्च शैक्षणिक पात्रता तसेच नामांकित बँकेत वरिष्ठ पदावरील अनुभव आवश्यक असून वयोमर्यादा साधारण ४० ते ५० वर्षे ठेवण्यात आली आहे.
Manager पदासाठी किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक असून JAIIB/CAIIB किंवा बँकिंग व फायनान्स संबंधित डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या पदासाठी वयोमर्यादा ३० ते ४० वर्षे आहे.
Management Trainee (CA) पदासाठी Chartered Accountant पात्रता अनिवार्य असून Income Tax, GST, Accounts आणि Finance क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे
Officer पदासाठी किमान ३ वर्षांचा बँकिंग किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव अपेक्षित असून वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे आहे.
सर्व पदांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक आहे. योग्य उमेदवारांच्या बाबतीत अनुभव व वयोमर्यादेत सवलत दिली जाऊ शकते, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी आपला सविस्तर बायोडेटा, अलीकडील फोटो आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत बँकेच्या अधिकृत पत्त्यावर किंवा hr@bhagininivedita.bank.in या ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाकडे राहणार असून त्याबाबत कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही, असेही बँकेने नमूद केले आहे.