दि बारामती सहकारी बँकेत वरिष्ठ पदांसाठी भरती 
Co-op Banks

दि बारामती सहकारी बँकेत वरिष्ठ पदांसाठी भरती

अनुभवी व पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड

Prachi Tadakhe

बारामती : पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या आणि सुमारे ₹३,५०० कोटींचा एकूण व्यवसाय असलेल्या दि बारामती सहकारी बँक लिमिटेड मध्ये मुख्यालय स्तरावर विविध वरिष्ठ पदांसाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

बँकेचे मुख्यालय भिगवण रोड, बारामती, जि. पुणे – ४१३ १०२ येथे असून उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आपले अर्ज recruitment@baramatibank.com या ई-मेल आयडीवर पाठवायचे आहेत.

भरती होणारी पदे व तपशील

1. सरव्यवस्थापक (General Manager – Credit)

  • पदसंख्या :

  • पात्रता : पदवीधर / द्विपदवीधर / एम.ए., CAIIB, CA (Appeared), ICWA पूर्ण किंवा Appeared

  • अनुभव : बँकिंग क्षेत्रातील क्रेडीट अप्रायझल व तत्सम पदावर १० ते १२ वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा : ४० ते ४५ वर्षे

2. उपसरव्यवस्थापक – प्रशासन (Asst. General Manager – Admin)

  • पात्रता : पदवीधर / द्विपदवीधर / MBA, CAIIB, CA / ICWA

  • अनुभव : बँकिंग क्षेत्रातील प्रशासकीय पदावर ८ ते १० वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा : ४० ते ५० वर्षे

  • पदसंख्या :

3. उपसरव्यवस्थापक – क्रेडीट (Asst. General Manager – Credit)

  • पदसंख्या :

  • पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर / द्विपदवीधर, MBA, CAIIB, CA / ICWA (Appeared)

  • अनुभव : संबंधित पदावर ०८ ते १० वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकेतील अधिकारी

  • वयोमर्यादा : ३५ ते ४० वर्षे

4. कायदा अधिकारी (Legal Officer)

  • पात्रता : पदवीधर / द्विपदवीधर, LLB उत्तीर्ण

  • आवश्यक ज्ञान :

    • SARFAESI Act

    • कर्ज वसुली प्रक्रिया

    • दिवाणी न्यायालयीन कामकाज

    • बँकिंग दस्तऐवजांची तपासणी

  • अनुभव : बँकिंग क्षेत्रातील ८ ते १० वर्षांचा अनुभव

  • वयोमर्यादा : ३५ ते ४० वर्षे

निवड प्रक्रिया

वरील सर्व पदांसाठी उमेदवारांना मॉडर्न बँकिंगचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, चांगले संभाषण व संघटन कौशल्य आवश्यक आहे.
शासनमान्य संस्थेमार्फत लेखी परीक्षा घेण्यात येणार असून त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

बँक व्यवस्थापन

  • अध्यक्ष : श्री. सचिन सदाशिवराव सातव

  • उपाध्यक्षा : सौ. नुपूर आदेशकुमार शहा

  • कार्यकारी संचालक : श्री. विनोद कांतीलाल रावळ - सर्व संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य

अधिक माहितीसाठी :
Website : www.bsbl.bank.in
Email : recruitment@baramatibank.com
संपर्क : (02112) 222844 / 224865

SCROLL FOR NEXT