लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक 
Co-op Banks

लातूर अर्बन को.ऑप बँकेत कर्मचारी नियुक्तीची सुवर्णसंधी!

कराड, सातारा व जालना शाखांसाठी भरती जाहीर - सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभव, संगणक कौशल्य व शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मोठी करिअर संधी

Prachi Tadakhe

बँकेच्या विस्तार योजनांचा एक भाग म्हणून नियोजित कराड, सातारा आणि जालना शाखांसाठी विविध पदांवर पात्र व अनुभवी कर्मचाऱ्यांची तातडीने भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे बँक आपल्या सेवा अधिक सक्षम, आधुनिक व ग्राहकाभिमुख करण्याच्या दिशेने पुढाकार घेत आहे.

कोणकोणती पदे?

या भरती अंतर्गत खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत –

  • मॅनेजर

  • ऑफिसर

  • क्लर्क

  • तसेच इतर संबंधित पदे

आवश्यक पात्रता व अटी

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पुढील अर्हता असणे आवश्यक आहे –

  • संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • सहकारी बँक क्षेत्रातील कामाचा अनुभव

  • संगणकाचे प्रभावी ज्ञान (Core Banking, MIS, रिपोर्टिंग, इ.)

अनुभवी व कार्यक्षम उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला Resume (केवळ बायोडाटा) खालील ई-मेल पत्त्यावर पाठवावा –
career@laturbank.co.in

अर्ज करण्याची अंतिम मुदत: 8 दिवसांच्या आत

संपर्कासाठी

अधिक माहितीसाठी संपर्क साधा - 9623454907

ही भरती बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. अनुभव, कौशल्य आणि आधुनिक बँकिंग प्रणालीचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT