'बँको मासिक वर्धापन विशेषांक मे - जून २०२६' - Banco Magazine Anniversary Issue 2026  
Arth Warta

बँकिंग व सहकारातील अग्रगण्य, विश्वासार्ह 'बँको मासिक वर्धापन विशेषांक मे - जून २०२६' प्रसिद्ध.

बँको मासिकाचे १९ व्या वर्षात यशस्वी पदार्पण सहकार व बँकिंग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि विचारवंतांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश.

Prachi Tadakhe

कोल्हापूर : सहकारी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह माध्यम असलेल्या 'बँको' (Banco) मासिकाचा 'वर्धापन विशेषांक २०२६' (मे-जून २०२६ आवृत्ती) नुकताच दिमाखात प्रकाशित झाला आहे. अविज पब्लिकेशन (Avies Publication) अंतर्गत गेल्या १८ वर्षांपासून अविरतपणे बँकिंग सहकार व अर्थ क्षेत्राला विश्वासू मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या 'बँको' मासिकाने या विशेषांकासह आपल्या यशस्वी १९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

या संग्रहणीय विशेष वर्धापन अंकामध्ये बँकिंगचा नवा चेहरा –तंत्रज्ञान की मनुष्यबळ ?, आभासी बँकिंग : स्वप्न, वास्तव आणि आव्हाने , युद्धजन्य परिस्तिथी आणि बँकिंग व विकसित भारत व सहकारातून समृद्धी : राष्ट्रीय सहकार धोरण  यावर देशातील नामांकित बँकिंग तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि ज्येष्ठ सहकार अभ्यासकांच्या  विशेष लेखांचा आणि विश्लेषणाचा समावेश असून सहकारी बँका, पतसंस्था आणि वित्तीय संस्थांच्या संचालक मंडळापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत व या विषयातील अभ्यासक व आवड असणाऱ्या  सर्वांसाठीच हा अंक अत्यंत मार्गदर्शक आणि संग्राह्य ठरत आहे.

२०० पेक्षा जास्त पाने, आर्टपेपर वर उत्कृष्ट रंगीत छपाई व दर्जेदार निर्मिती मुल्ये असलेल्या या विशेषांकाची किंमत मात्र रु. १५०/- रुपये मूल्यामध्ये उपलब्ध आहे. वाचकांनी ९१६८६५८४८४ क्रमांकावर संपर्क करून आपला अंक आरक्षित करावा.  अथवा marketing@bancoindia.org या ई-मेल द्वारे संपर्क करावा असे आवाहन करणेत आले आहे.

तसेच जुलै २०२६ महिन्यात ‘बँको मासिका’चा ‘द्विशतक पूर्ती - २०० वा अंक असलेने वेगळ्या स्वरुपात, अधिक माहितीपूर्ण व आकर्षक रंगसंगतीमध्ये प्रकाशित करण्याचा मानस असून लवकरच त्याबाबत माहिती दिली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT