पंचगंगा बँकेच्या पाचव्या कराड शाखेचा प्रारंभ

बँकांनी विश्वासार्हता जोपासावी, जोखीम कमी करावी : डॉ. भोसले
पंचगंगा बँकेच्या पाचव्या कराड शाखेचा प्रारंभ
पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या पाचव्या शाखेचा प्रारंभ कराड येथील कृष्णा नाका येथे कृष्णा विश्व विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते  झाला.पंचगंगा नागरी सहकारी बँक
Published on

कोल्हापूर : येथील पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या पाचव्या शाखेचा प्रारंभ कराड येथील कृष्णा नाका येथे कृष्णा विश्व विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते नुकताच  झाला. याप्रसंगी डॉ. सुरेश भोसले म्हणाले, बँकिंगमध्ये विश्वासार्हता महत्त्वाची असते. छोट्या छोट्या ठेवी, कर्जे स्वीकारून बँकेने आपली जोखीम कमी करावी, असे आवाहन केले.

यावेळी पंचगंगा बँकेची स्थापना १९७२ साली झाली असून या बँकेचा कोल्हापुरातील चार शाखा मिळून सुमारे ६०० कोटी रुपये व्यवसाय आहे.बँकेचा सुरुवातीपासूनच सलगपणे नेट एनपीए शून्य टक्के आहे व बँक सभासदांना १० टक्के लाभांश देत असल्याचे अध्यक्ष ॲड. रामचंद्र टोपकर यांनी सांगितले. राजाराम शिपुगडे यांनी आभार मानले.

 यावेळी भगवान काशीद, विजय चव्हाण, डॉ. माधुरी कुलकर्णी, भालचंद्र साळोखे, उपेंद्र सांगवडेकर, केशव गोवेकर, सुनील पेठे, राकेश कापशीकर, अंजली वालावलकर, उमेश भोसले, राजगोंडा पाटील, सौरभ मुजुमदार, डॉ. मधुरा कुलकर्णी, दीपक सांगलीकर, प्रशांत कामत, ॲड. मंदार परांजपे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस, महाव्यवस्थापक सुशील कुलकर्णी, बँकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Banco News
www.banco.news